- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २२ ते २५ आॅगस्ट या काळात विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात ते जर्मनी, लंडनचा दौरा करतील. देशाच्या बाहेर असलेल्या भारतीयांशी थेट संवाद करणे हा दौऱ्याचा उद्देश आहे. हा दौरा सॅम पित्रोदा यांच्या सल्ल्यानुसार आयोजित केला आहे. याचे नियंत्रणही सॅम पित्रोदा हेच करत आहेत.राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सिंगापूरसह अन्य देशांचा दौरा करून समर्थन मिळविले होते. त्यानंतर आता हा दौरा निश्चित झाला आहे. तुर्कीमध्ये व्यापक घटना सुरु असताना व लीरामध्ये (चलन) आलेल्या घसरणीकडे जगाचे लक्ष असताना राहुल गांधी यांचा हा दौरा होत आहे. याचा किती व्यापक परिणाम होईल याचे आकलनही राहुल गांधी यांच्या संवादाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होणार आहे.राहुल यांच्या दौºयात प्रवासी भारतीयांशी चर्चा, कर्मचारी, उद्योगपती यांच्याशी चर्चा आणि इंडियन ओवर्सीज काँग्रेसच्या दोन बैठका यांचा समावेश आहे. याशिवाय राहुल गांधी या दोन देशात यंग ग्लोबल लीडर्स आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद करतील. ज्या मुद्यांवर चर्चा होणार आहे त्यात भारताची आर्थिक स्थिती, रोजगाराची समस्या, नोटाबंदीचे दुष्परिणाम, सुरक्षेबाबत आव्हाने आदी विषयांचा समावेश आहे.
राहुल गांधी २२ पासून विदेश दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:58 PM