राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 08:32 PM2024-07-29T20:32:49+5:302024-07-29T20:34:57+5:30

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे.

rahul gandhi and rajnath singh clashes in lok sabha over agneepath scheme | राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?


लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत, ‘‘सैन्यातील जवानांना अग्निपथच्या चक्रव्यूहात अडकवण्यात आले आहे. तसेच अर्थसंकल्पात अग्निवीरांना पेन्शनसाठी रुपयाही देण्यात आलेला नाही,’’ असे म्हटले होते. यानंतर, राहुल गांधी यांच्या याच वक्तव्याचा हवाला देत, "त्यांनी अग्निवीरांसंदर्भात देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थसंकल्पावर संभ्रम निर्माण केला असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे भाषण संपल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी जे काही गैरसमज निर्माण केले आहेत, त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री बोलतीलच. पण, अर्थसंकल्पासंदर्भात बरेच गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत, असे माझे मत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. लष्कराशी संबंधित अग्निवीरांबाबत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण (लोकसभा अध्यक्ष) आदेश द्याल तेव्हा मी अग्निवीरांसंदर्भात माझे निवेदन देण्यास तयार आहे."

राहुल गांधी म्हणाले, "राहुल गांधी ने कहा कि "संरक्षण मंत्र्यांनी यापूर्वीही म्हटले होते की, एका ‘हुतात्मा’ अग्निवीराच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. मात्र, ते खरे नाही. त्यांचे म्हणणे चूक होते. त्या कुटुंबाला विमा देण्यात आला आहे, भरपाई नाही. हे सस्त आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’’ 

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे.
 

Web Title: rahul gandhi and rajnath singh clashes in lok sabha over agneepath scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.