रोजगारनिर्मितीसाठी राहुल गांधी यांनी जाहीर केला प्लॅन, स्टार्टअपसाठी युवकांना अनेक प्रकारच्या सवलती देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:05 AM2019-03-29T05:05:58+5:302019-03-29T05:10:02+5:30
रोजगारनिर्मितीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्लॅन जाहीर केला असून, देशातील युवकांनी व्यापार सुरू करावा यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देऊ, अशी घोषणा गुरुवारी त्यांनी केली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : रोजगारनिर्मितीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्लॅन जाहीर केला असून, देशातील युवकांनी व्यापार सुरू करावा यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देऊ, अशी घोषणा गुरुवारी त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर युवकांना संबोधित केले व जे युवक नवा व्यापार सुरू करू इच्छितात आणि देशात रोजगाराची संधी निर्माण करू पाहतात त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार कोणतीही परवानगी न घेण्याची सुविधा व्यापार सुरू करण्यासाठी तीन वर्षांपर्यंत देईल, असे जाहीर केले.
दोन एप्रिल रोजी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून त्या आधी राहुल गांधी यांनी आमचे सरकार युवकांना व्यापार सुरू करण्यासाठी बँकेकडून सहजपणे कर्ज, टॅक्स क्रेडिट आणि प्रोत्साहन रक्कम उपलब्ध करून देईन, असे म्हटले.
अत्यंत गरीब कुटुंबाला गांधी यांनी याआधीच दरमहा सहा हजार रूपये खात्यात जमा केले जातील, असे आश्वासन दिलेले आहे. असा व्यापार एंजेल टॅक्समुक्त ठेवला जाईल आणि जे युवक व्यापार सुरू करतील त्यांना टॅक्स क्रेडिटसोबत प्रोत्साहन रक्कमही दिली जाईल.