सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी
By देवेश फडके | Published: February 11, 2021 03:59 PM2021-02-11T15:59:41+5:302021-02-11T16:01:50+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील पँगाँग लेक येथे असलेल्या सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. यानंतर आता राजकारण तापयला लागले असून, विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (rahul gandhi asked why is govt insulting the sacrifice of our jawans)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वर्तमानात न शांतता आहे आणि ना शांततापूर्ण वातावरण आहे, असा दावा करत, सरकार आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान का करत आहे आणि आपला भूभाग चीनला का देत आहेत, असा रोकडा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे.
No status quo ante = No peace & tranquility.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 11, 2021
Why is GOI insulting the sacrifice of our jawans & letting go of our territory?
काय म्हणाले राजनाथ सिंह राज्यसभेत?
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले.
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.