शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

असा आहे whatsappचा भारतातील डिजिटल बँकिंग प्लॅन, ज्यावरून राहुल गांधींनी भाजपावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 2:58 PM

व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हॉट्सअ‍ॅप डिजिटल बँकिंगवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात 40 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपला पैशांच्या देवाणघेवाणीची सेवा सुरू करायची असेल तर मोदी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. अशात, व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे.

भारतात डिजिटल बँकिंग सेवा सुरू करण्याची व्हॉट्सअ‍ॅपची इच्छा आहे. 22 जुलैला झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये  व्हॉट्सअ‍ॅपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतातील प्लॅन स्पष्ट केला. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील प्रमुख अभिजीत बोस यांनी सांगितले, की यूपीआयावर आधारलेल्या सेवांप्रमाणेच याची सुरुवात होईल. मात्र, भारतात लोकांना फायनांशिअल सेवांपर्यंत पोहोचवणे आणि बँकांच्या डिजिटल सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हा व्हॉट्सअ‍ॅपचा मुख्य उद्देश्य आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आता बँकांशी मिळवणार हात -कंपनी या सुविधा, बँकांशी पार्टनरशिप करून, त्यांच्यासोबत काम करून, नॉन-बँकिंग फायनांशिअल कंपन्यांच्या सोबतीने आणि विमा कंपन्यांच्या साथीने लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. अभिजीत बोस यांनी सांगितले, की येणाऱ्या काळात ते अनेक पायलट प्रोजेक्ट्सवर काम करणार आहेत. यादरम्यान या सेवांत येणाऱ्या अडचणींचा विचार केला जाईल आणि त्यांचे समाधानही केले जाईल.

या 3 सेवा सुरू करण्याच्या विचारात व्हॉट्सअ‍ॅप -व्हॉट्सअ‍ॅप बँका आणि इतर फायनांशिअल सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सोबतीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी 3 विशेष सुविधा देण्याची योजना तयार करत आहेत. याच्या पहिल्या सेवेत पेन्शन, दुसऱ्या सेवेत विमा आणि तिसऱ्या सेवेत मायक्रो लोनचा समावेश आहे. 

देशात जवळपास 30 कोटी लोकांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मात्र, ते असे करत नाहीत. याचे एक कारण असेही आहे, की या स्कीम विकण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. तसेच डिजिटल लिटरेसीच्या आभावामुळे हे अधिक कठीन होते. व्हॉट्सअ‍ॅप या सुविधा लोकांना विकण्यासाठी जो खर्च येतो तो अत्यंत कमी करण्याची योजना आखत आहे. यात पेन्शनप्रमाणेच विमा आणि मायक्रो क्रेडिटचीही सुविधा आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

लोकल खेळण्यांसाठी व्होकल व्हा, 'मन की बात'मधून मोदींचं देशवासियांना आवाहन

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस