- शीलेश शर्मानवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढविताना, देशाचे चौकीदारच भ्रष्टाचारी आणि चोर निघाले, असा सनसनाटी आरोप केला.मोदी यांनी देशातील जनता व सैनिकांचा विश्वासघात केला असून, सैनिकांच्या खिशातून पैसा काढून अनिल अंबानी यांचा खिसा भरला, अशी टीकाही त्यांनी केली.मोदी यांच्यामुळेच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल सौद्यात सहभागी करून घेण्यात आले, असे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले होते. त्याचा आधार घेत, अनुभव नसलेल्या अंबानींच्या कंपनीला कंत्राट का देण्यात आले, याचा खुलासा आता पंतप्रधान मोदी यांनीच करावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, मोदी यांनी अनिल अंबानी यांना तब्बल ३0 हजार कोटी रुपयांची भेटच या व्यवहाराद्वारे दिल्याचे उघड झाले आहे.अशा परिस्थितीत सत्य बाहेर येण्यासाठी राफेल व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समितीमार्फतच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. मोदी सरकारने ५२६ कोटी रुपयांची विमाने ९,६00 कोटी रुपयांना विकत घेण्याचा उद्योग केला, असा आरोपही त्यांनी केला.स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे मोदी सरकार प्रत्यक्षात चोर निघाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व विषयावर मोदी अद्याप गप्प का आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनीच मोदी यांना चोर म्हटल्यानंतर तरीराहुल करताहेत पाकला मदत - भाजपाभाजपातर्फे लगेचच राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करण्यात आले. यूपीए सरकारच्या काळातच अनिल अंबानी यांच्या कंपनीशी डेसॉ एव्हिएशनने करार केला होता, असा दावा करीत, राहुल गांधी दिशाभूल करणारी खोटी विधाने करीत असल्याचा आरोप कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. कोळसा व टूजी सारखे घोटाळे करणाऱ्या आणि त्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या काँग्रेसने आमच्यावर खोटे आरोप करू नयेत, असे प्रसाद म्हणाले. राफेल कराराची माहिती जगजाहीर करून राहुल पाकिस्तानला मदत करू पाहात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
देशाचे चौकीदारच निघाले चोर; जनतेचा, सैनिकांचा हा विश्वासघात, राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 6:48 AM