शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

मी नरेंद्र मोदी, मी तुमचा डेटा अमेरिकी कंपन्यांना देतोय, राहुल गांधींंकडून NaMoApp वर प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 12:46 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये रणकंदन माजले आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संपर्कात राहण्यासाठी नमो अॅप आणले होते. मात्र काँग्रेसने या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी माहिती लीक होत असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली  -  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये रणकंदन माजले आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संपर्कात राहण्यासाठी नमो अॅप आणले होते. मात्र काँग्रेसने या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी माहिती लीक होत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसकडून सोशल मीडियावर  #DeleteNaMoApp अभियानही चालवण्यात येतेय. आतातर खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादात उडी घेतली असून, ट्विटरवर एक पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी नरेंद्र मोदी, मी तुमचा सगळा डेटा अमेरिकी कंपन्यांमधील माझ्या मित्रांना पुरवत आहे, अशी खोचक टिप्पणी या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.  रविवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नमो अॅपला टीकेचे लक्ष्य केले. या ट्विटमध्ये राहुल गांधी लिहितात, "हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपमध्ये साइन इन करता तेव्हा मी तुमची सगळी माहिती अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो." नमो अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींची खासगी माहिती त्यांची कुठलीही परवानगी न घेता अमेरिकन कंपन्यांना पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे.  

नमो अॅपवरून काँग्रेसने मोदी  आणि भाजपाला चौफेर घेरले आहे. नरेंद्र मोदी अॅपवर खाते उघडणाऱ्यांची खासगी माहिती क्लेव्हर टॅप नामक अमेरिकन कंपनीला पाठवली जात असल्याचा आरोप एका ट्विट्च्या माध्यमातून केला जात आहे. नमो अॅप अँड्रॉइट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, गुगल प्ले स्टोअर्सवर असलेल्या माहितीनुसार हे अॅप सुमारे 50 लाख हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस केवळ मोदींनाच नव्हे तर मोदी अॅपलापण घाबरली असल्याचा टोला लगावला आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाcongressकाँग्रेसBJPभाजपा