काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर आज मोठं वक्तव्य केले आहे. 'आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, अस वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'आमची यात्रा द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. तसेच आपल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देशातील महागाई आणि बेरोजगारी दूर करणे हा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आजपर्यंत देशातील संस्थांवर आरएसएस आणि भाजपचे पूर्ण नियंत्रण आहे. भाजप भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केला.
'देशातील एक टक्का श्रीमंतांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे. केंद्र सरकारवर आरोप करत राहुल म्हणाले की, देशात तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे.
राहुल गांधी यांनी होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेतील त्रुटींबाबत वक्तव्य केले. 'अनेकदा अशा घटना उत्साहात घडतात, असं राहुल गांधी म्हणाले. प्रत्यक्षात एक व्यक्ती अचानक राहुल गांधी यांना मिठी मारण्यासाठी धावली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तेथून तत्काळ हटवले.