Rahul Gandhi : "चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 09:37 AM2024-08-07T09:37:24+5:302024-08-07T09:56:16+5:30

Rahul Gandhi And Vinesh Phogat : विनेश फोगाटने फायनलमध्ये धडक घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे

Rahul Gandhi attack on bjp over Vinesh Phogat entry in paris olympics finals says she gave reply on mat | Rahul Gandhi : "चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

Rahul Gandhi : "चॅम्पियन्सची हीच ओळख, ते मैदानातूनच उत्तर देतात"; विनेशसाठी राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

भारतीय प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने इतिहास रचला आहे. विनेशने फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केलं आहे. मंगळवारी महिला मॅटवरच्या कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात फ्रीस्टाईल इव्हेंट सेमीफायनलमध्ये क्यूबाची रेसलर युसनेइलिस गुजमैनचा ५-० ने दारुण पराभव केला. आता विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे.

विनेश फोगाटने फायनलमध्ये धडक घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे."

"ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष खोटा ठरवला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरं मिळाली आहेत. आज भारताच्या शूर कन्येसमोर तिला रडवणारी संपूर्ण सत्ताव्यवस्था कोसळली आहे. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुझ्या यशाची गर्जना दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं तिच्याकडे गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत विनेशनं १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने चांगली टेकडाउन करत आणखी ४ गुण मिळवले. संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय कुस्तीपटूचे बचावात्मक कौशल्य पाहण्यासारखे होते. केवळ  बचावात्मक खेळ न दाखवता काऊंटर अटॅक करून विनेशनं मॅचमध्ये वर्चस्व राखले आणि शेवटी ५-० असा विजय मिळवला. 
 

Web Title: Rahul Gandhi attack on bjp over Vinesh Phogat entry in paris olympics finals says she gave reply on mat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.