'UPSC ऐवजी RSS मधून पदभरती; आरक्षण...', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 03:34 PM2024-08-18T15:34:51+5:302024-08-18T15:35:01+5:30

राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत असतात.

Rahul Gandhi Attack PM Narendra Modi 'Recruitment from RSS instead of UPSC', Rahul Gandhi's attack on central government | 'UPSC ऐवजी RSS मधून पदभरती; आरक्षण...', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

'UPSC ऐवजी RSS मधून पदभरती; आरक्षण...', राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi Attack PM Narendra Modi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर (Narendra Modi Government) आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर आरक्षण, सरकारी पदभरती आणि RSS वरुन हल्लाबोल केला आहे. 

एक्स अकाउंटवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, "केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या माध्यमातून मोठ्या सरकारी पदांची भरती करुन नरेंद्र मोदी संविधानावर हल्ला करत आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करुन एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे." 

"मी नेहमी म्हणत आलो आहे की, देशातील सर्वोच्च पदांवर वंचितांचे प्रतिनिधित्व नाही. त्यात सुधारणा करण्याऐवजी लॅटरल एन्ट्रीद्वारे वंचितांना उच्च पदांवरुन दूरे केले जात आहे.  यूपीएससीची तयारी करणाऱ्या होतकरू तरुणांच्या हक्कांवर हा दरोडा असून, वंचितांसाठी आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मोठा धक्का आहे. काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर बसून काय करू करतात, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सेबी आहे. खाजगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदाच अध्यक्ष केले गेले."

अमित शाहंनी 188 पाकिस्तानी हिंदूंना दिले भारतीय नागरिकत्व, विरोधकांवर साधला निशाणा...

"प्रशासकीय संरचना आणि सामाजिक न्याय, या दोघांनाही धक्का लावणाऱ्या देशविरोधी पाऊलाचा इंडिया तीव्र विरोध करेल. आयएएसचे खाजगीकरण, ही आरक्षण संपवण्याची 'मोदींची गॅरंटी' आहे," अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.

Web Title: Rahul Gandhi Attack PM Narendra Modi 'Recruitment from RSS instead of UPSC', Rahul Gandhi's attack on central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.