शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 2:35 PM

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Attacks Modi Govt:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर (Central Goverenment) पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्रावर गंभीर आरोप करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. 

तरुणांना बेरोजगार करून सरकार कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांनी काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात ते आपल्या हक्काची मागणी करत आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर दुप्पट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.

राहुल सरकारला हुकूमशहा म्हणालेराहुल गांधींनी ट्विट केले की, "प्रश्न विचारू नका, आवाज उठवू नका, शांततेने आंदोलन करू नका, नवीन भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते. तरुणांना बेरोजगार करून, कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत हे हुकूमशाही सरकार देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.'

यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर गेल्या 5 वर्षात 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारी दुप्पट केल्याबद्दल हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी विचारले होते की, टटदेशातील तरुण पंतप्रधानांच्या ‘लबाडी’साठी ‘भूल करणारा’, ‘विश्वासघात’ आणि ‘फसवणूक’ यासारखे ‘असंसदीय’ शब्द वापरू शकतात का?'' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा