नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत. तसेच राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यामुळे कोणत्याही संधीचा फायदा घेत राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच आता राहुल गांधी वारंवार मोदींना लक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरराहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेज(ILFS)ला डुबण्यापासून वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. मोदींचा हा I Love Financial Scams तर नाही ना?, या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी मोदी एलआयसीचा पैसा वापरत आहेत. तसेच IL&FS या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना 2007मध्ये 70 हजार कोटींचा गिफ्ट सिटी नावाचा प्रोजेक्ट दिला होता. परंतु या प्रोजेक्टअंतर्गत कोणतंही काम करण्यात आलेलं नसून उलट भ्रष्टाचारच समोर आला.ILFSमध्ये 40 टक्के हिस्सा एलआयसी, एसबीआय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियासारख्या सरकारी संस्थांची भागीदारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कंपनीत 40 टक्के हिस्सा हा सरकारी कंपन्यांचा आहे. त्यामुळे त्या कंपनीच्या डोक्यावर 91 हजार कोटींचं कर्ज कसे ?, तसेच 91 हजार कोटींमधले 67 कोटी रुपयांचा एनपीए आहे.
पंतप्रधान मोदी LICचा पैसा बुडणाऱ्या कंपनीत का गुंतवताहेत?; राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:36 IST