जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत देशात २ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "ना चाचण्या आहेत, ना हॉस्पीटलमध्ये बेड. ना व्हेंटिलेटर आहेत, ना ऑक्सिजन, लसीही उपलब्ध नाही. केवळ उत्सवाचं ढोंग सुरू आहे. PMCares?," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे.
"ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:02 PM
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे.