नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एका कवितेतून मोदी सरकारवर टीका केली आहे. राफेल करारावर राहुल यांनी ही कविता लिहिली असून यातून मोदींना टोमणे लगावले आहेत. जनजन मे फैल रही है सनसनी, मिलकर रोकेंगे लुटेरों की कंपनी, असे राहुल यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. म्हणजेच, मोदींच्या मंत्रिमंडळाला राहुल यांनी लुटारुंची टोळी असे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कविता करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथील सभेत बोलतानाही राफेल करारावरुन राहुल यांनी मोदींवर टीका केली. राफेल करार हा गोपनीय भाग असून याच्या किंमतीबाबत जाहीरपणे बोलता येत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, मी जेव्हा फ्रान्सच्या पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळी राफेलच्या गोपनीयतेबद्दल चर्चा केली. त्यावेळी, त्यांनी असे काहीही नसून मोदी याबाबत जाहीर करू शकतात, असे म्हटल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी दोन दिवसीय मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच राहुल यांनी चित्रकूटमधील कामतानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, आयोजित सभेत बोलताना राहुल गांधींनी राफेल करारावरुन मोदी सरकारला टार्गेट केलं.
राहुल गांधींची कविता...