काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील टप्प्याचा कालचा शेवटचा दिवस होता. आता राहुल गांधी 'भारत जोडो'च्या पुढच्या प्रवासाला रवाना झाले आहेत. या यात्रेचा राजकीय फायदा दिसून येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल आणि लोकांचं मतपरिवर्तन नक्की होईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात एका यूट्यूबरशी साधताना त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. राहुल यांनी एकदा आईला म्हणजेच सोनिया गांधी यांना मी हँडसम दिसतो का? असं विचारलं होतं. त्यावर सोनियांनी...नाही, ठीकठाक दिसतोस असं प्रांजळ मत दिलं होतं.
महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी यूट्यूबर समदीश भाटिया याला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. "मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी आईजवळ जाऊन विचारायचो की मी हँडसम दिसतो का? तेव्हा आईनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं की नाही. तू ठिकठाक दिसतोस. माझी आई अशीच आहे. ती तुम्हाला लगेच आरसाच दाखवते. माझे वडीलही असेच होते. माझं संपूर्ण कुटूंब असंच आहे. तुम्ही जर काही सांगू इच्छित असाल तर तुम्हाला थेट सत्याचा सामना करुन दिला जातो. खोटी स्तुती करणं माझ्या कुटुंबीयांना कधीच जमत नाही", असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींचे शूज कोण खरेदी करतं?आपल्या लाइफस्टाइलबाबत बोलत असताना राहुल गांधींच्या शूज बाबतही विचारलं गेलं. तुम्ही तुमचे शूज स्वत:च खरेदी करता का? असं विचारलं असता राहुल यांनी कधी-कधी त्यांची आई किंवा बहिण शूज पाठवते असं म्हटलं. तर काही नेते मित्रमंडळी शूज भेट म्हणून देत असल्याचंही सांगितलं. भाजपामधून कुणी तुम्हाला कधी शूज पाठवलेत का? असं विचारलं असता राहुल यांनी मिश्किलपणे ते तर माझ्यावर बुट फेकतात, असं म्हटलं.
भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?
महाराष्ट्रातील टप्पा संपलाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याच्या समारोपप्रसंगी त्यांचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता असं म्हटलं. तसंच महाराष्ट्रानं आपल्याला प्रेम आणि विश्वास दिला, याचे आभारही व्यक्त केले. राहुल गांधींनी मोदी सरकारवर पंचायत आणि अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा (PESA कायदा), वन हक्क कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण यासारखे कायदे सौम्य केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यावर हे कायदे आणखी मजबूत केले जातील.
२३ नोव्हेंबरपासून यात्रेचा मध्य प्रदेशातील टप्पा सुरू होणार२१ आणि २२ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात थांबून २३ नोव्हेंबरला मध्य प्रदेशच्या दिशेने प्रयाण करेल. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, महिला, तरुण आणि शेतकरी या यात्रेत प्रमुख सहभागी आहेत. या यात्रेने प्रेरणादायी संदेश दिला असून नवी काँग्रेस उदयास येत असल्याचा दावा त्यांनी केला. यात्रेसाठी उत्तम व्यवस्था केल्याबद्दल रमेश यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटच्या नेतृत्वाचे आभार मानले. यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी यात्रेअंतर्गत राज्यात ३८० किलोमीटरहून अधिक अंतर कापण्यात आल्याची माहिती दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"