राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:38 PM2018-02-21T18:38:41+5:302018-02-21T18:41:39+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे.

Rahul Gandhi 'child', win more than 150 seats - BS Yeddyurappa | राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा 

राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा 

Next

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर पाहयला मिळणार आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला आहे. 
भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी एका प्रचार सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी 'बच्चा' अशा शब्दात राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. कर्नाटकात बच्चा (राहुल गांधी) आला आहे. मात्र, आम्हाला माहिती आहे की आम्ही विधानसभेच्या 150हून अधिक जागा जिंकू, अशा शब्दांत बी.एस. येदियुरप्पा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक प्रचार सभा सुरु असून त्यांनीही भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. 



 

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच
बेल्लारी येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांची भाजपावर हल्लाबोल केला होता. यावेळी म्हणाले की, भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका त्यांनी केली. 
 

Web Title: Rahul Gandhi 'child', win more than 150 seats - BS Yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.