राहुल गांधींना दिलासा; दुहेरी नागरिकत्वाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:36 PM2019-05-09T12:36:55+5:302019-05-09T12:38:01+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली दुहेरी नागरिकत्वाची याचिका फेटाळून लावल्याने राहुल यांना दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली दुहेरी नागरिकत्वाची याचिका फेटाळून लावल्याने राहुल यांना दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र या याचिकेत कोणतंही तथ्य नसल्याने ही याचिका फेटाळून लावत असल्याचं मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.
2 मे रोजी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर कोर्टात निर्णय झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वइच्छेने ब्रिटनची नागरिकता स्वीकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गृह मंत्रालयानेही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती.
"We dismiss the petition. There is no merit in the petition," said CJI Ranjan Gogoi https://t.co/QWLM77oc5r
— ANI (@ANI) May 9, 2019
राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक?