नवी दिल्ली : लष्करातील जवानांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी आणखी सुसज्ज कसे करता येईल यापेक्षा त्यांच्या गणवेशावरच संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीने अधिक काळ चर्चा करून वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डी या तिघांनी केला. तसेच या समितीच्या बैठकीतून बुधवारी सभात्याग केला.या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत उपस्थित होते. लष्करी जवानांचा गणवेश कसा असावा याबाबत त्या दलाचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतात. तरीही त्याच विषयावर संरक्षणविषयक संसदीय समितीचे सदस्य अधिक चर्चा करत बसले व वेळ वाया दडविला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.परवानगी नाकारलीलडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांबद्दलचा मुद्दा राहुल गांधी यांना या समितीच्या बैठकीत उपस्थित करायचा होता. मात्र त्याला संरक्षणविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष व भाजप खासदार जुआल ओराम यांनी परवानगी दिली नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर संरक्षणविषयक संसदीय समितीत चर्चा झाली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.
...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 3:01 AM