शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ठरलं ! काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी 4 डिसेंबरला दाखल करणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 10:55 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची कमान सोपवण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची कमान सोपवण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 4 डिसेंबरला काँग्रेस मुख्यालयात अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी 1 आणि 2 डिसेंबरला केरळमध्ये असतील. दरम्यान, बुधवारी (29 नोव्हेंबर) राहुल गांधी गुजरातच्या दौ-यावर असणार आहेत. येथे सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या दोन दिवसीय दौ-याची सुरुवात करतील. 

दरम्यान, गेल्या दिवसांपासूनच राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपवले जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपवले जाण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या स्तरावर बदल होऊ शकतात.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षात निर्णयाच्या प्रक्रियेत पूर्णतः बदल होऊ शकतात. राहुल गांधी यांच्यासोबत दोन नवीन नेत्यांनाही निर्णय प्रक्रियेत आणलं जाईल. हे नेते राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपवलं गेल्यानंतर त्यांना मदत करतील.  दरम्यान, काही राज्यांतील समितींनी फार पूर्वीच राहुल गांधी यांना लवकरात लवकर अध्यक्ष बनवण्यासाठीचा प्रस्तावही पारित केला आहे. तर दुसरीकडे 31 डिसेंबरपर्यंत काँग्रेस पक्षातील अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान 9 डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, असे मानले जात आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी सूत्रे हाती घ्यावी, अशी एकमुखी विनंती केली होती. त्यानंतर पक्षाच्या निवडणुका झाल्या. पण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक मात्र लांबणीववर पडत गेली होती. शिवाय स्वत: राहुल गांधींनी नेमणुकीपेक्षा निवडून येण्याचा आग्रह धरला होता.

सन २००४ मध्ये सक्रिय राजकारणात आलेल्या राहुल गांधींना सन २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष केले गेले. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे पक्षाचा कारभार लौकिक अर्थाने तेच चालवीत होते. आता गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचाराची धूराही तेच मोठ्या आक्रमकतेने सांभाळत आहेत.

आणखी वाचा: 35 साल बाद! नाराज वरूण गांधी धरणार राहुलचा 'हात', प्रियंका करणार मध्यस्थी?

सोनियाजी मार्गदर्शकसन १९८९ पासून काँग्रेस अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक दीर्घकाळ पदावर राहिलेल्या पक्षाध्यक्षा आहेत. सोनियाजी पक्षाच्या मार्गदर्शक व काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी कायम राहतील, असे संकेत पक्षातून मिळाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस