“७५ वर्षांत असे झाले नाही, मोदींच्या कार्यकाळात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 10:49 PM2022-02-13T22:49:08+5:302022-02-13T22:50:03+5:30

लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.

rahul gandhi criticised modi govt over abg shipyard fraud to sbi | “७५ वर्षांत असे झाले नाही, मोदींच्या कार्यकाळात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक”

“७५ वर्षांत असे झाले नाही, मोदींच्या कार्यकाळात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक”

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून घोटाळे, फसवणूक यासंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरित्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, गेल्या ७५ वर्षांत असे झाले नाही, अशी टीका केली आहे. 

एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपन्यांच्या अनेकविध ठिकाणच्या कार्यालयांवर सीबीआयने छापेमारी केली. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली होती. आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

मोदी काळात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची फसवणूक

मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतीय जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

दरम्यान, एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजे बांधणे आणि दुरुस्तीच्या व्यवसायात आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेजची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर, एबीजी शिपयार्डशी संबंधित मुंबईतील काही ठिकाणीही सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती देण्यात आली आहे.
 

Web Title: rahul gandhi criticised modi govt over abg shipyard fraud to sbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.