नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. एकीकडे कोरोना वाढत असताना, आरोप-प्रत्यारोप करत राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. अलीकडेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी सध्या क्वारंटाइन असून, त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. (rahul gandhi criticised pm modi and central govt over corona situation in country)
कोरोनामुळे देशातील दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी होम क्वारंटाइन असून, त्यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर देखील टीका केली आहे.
खोटे उत्सव, पोकळ भाषणबाजी नको
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचे नाही, केंद्र सरकारचे धोरण जनतेविरोधातील आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई
राहुल गांधींना कोरोनाची लागण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. सौम्य लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले होते. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय, राहुल गांधी यांनी कोरोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
भारताला ‘ना नफा’ तत्त्वावर लस पुरवण्यास तयार; Pfizer ची सरकारला ऑफर
दरम्यान, केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.