सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:02 AM2021-12-21T06:02:30+5:302021-12-21T06:03:26+5:30

पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. 

rahul gandhi criticism the central government is killing democracy | सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे; राहुल गांधी यांची केंद्रावर टीका

googlenewsNext

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : संसदेत विरोधी पक्षाने सातत्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की, मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करणाऱ्या विरोधकांना रोखत आहे. पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवालही त्यांनी केला. 

राहुल गांधी म्हणाले की, हे कसे सरकार आहे ज्यांना सभागृह सांभाळता येत नाही. महागाई, लखीमपूर, एमएसपी, लडाख, पेगॅसस, निलंबित सदस्य यांसारख्या मुद्द्यांवर आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, हिंमत असेल तर चर्चा होऊ द्या. 

दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही सरकारविरुद्ध आवाज उठविला आणि आरोप केला की, भाजप सरकार विरोधकांना भीती दाखवित आहे. अखिलेश यादव म्हणाले की, सरकार फोन टॅप करत आहे, तर दुसरीकडे ईडी, आयकर आणि अन्य एजन्सींचा दुरुपयोग करुन धाडी टाकल्या जात आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही आरोप होता की, मोदी - योगी सरकार बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करत आहेत. 

पेगॅसस मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. अन्य देशात भारताचा डेटा ठेवण्यात आला होता. याची चर्चा होऊ दिली नाही. हे तर लोकशाहीवरील आक्रमण आहे. त्याविरुद्ध आम्ही लढत आहोत.
 

Web Title: rahul gandhi criticism the central government is killing democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.