Rahul Gandhi Defamation Case:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. 'मोदी आडनाव' वर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात 2019 ला मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. आता गुरुवारी(23 मार्च) सूरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून, 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. न्यायाधीश एचएच वर्मा यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 504 अंतर्गत ही कारवाई केली आहे. दरम्यान, राहुल गांधींना तात्काळ जामीनही देण्यात आला.
काय आहे प्रकरण?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचे पहिले प्रकरण 2014 मध्ये दाखल झाले होते. हे प्रकरण महाराष्ट्राच्या भिवंडी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदवले गेले होते. राहुल गांधी यांनी भिवंडी येथे दिलेल्या भाषणादरम्यान महात्मा गांधी यांना मारण्याचा RSS वर आरोप केला होता. यानंतर संघाच्या कार्यकर्त्याने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.
2016 चे प्रकरणयानंतर 2016 मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे राहुल गांधींविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा दुसरा खटला नोंदवला गेला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी म्हणाले होते की, संघ सदस्यांनी त्यांना आसाममध्ये असलेले 16व्या शतकातील वैष्णव मठ बरपेटामध्ये प्रवेश नाकारला होता. त्यांच्या आरोपामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
20 कोटींचा मानहानी खटलात्यानंतर 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांची येथे राहुल गांधींविरोधात आणखी एक प्रकरण नोंदवले गेले. हे प्रकरण रांचीच्या उपविभागीय न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात चालू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुलविरूद्ध 20 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला नोंदविला गेला. त्यावेली राहुल यांनी 'मोदी चोर है' असे म्हटले होते.
गौरी लंकेशच्या हत्येशी संबंधित प्रकरणत्याच वर्षी महाराष्ट्रात राहुल गांधींविरूद्ध आणखी एक मानहान प्रकरण नोंदविण्यात आले. हे प्रकरण मजगावमधील शिवदी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदणीकृत आहे. हे प्रकरण युनियनच्या कामगारांनी दाखल केले होते. राहुल यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी गौरी लंकेशच्या हत्येला भाजप आणि संघाच्या विचारसरणीशी जोडले.