Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:03 PM2024-11-27T12:03:25+5:302024-11-27T12:06:13+5:30

Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

Rahul Gandhi demands Adani's arrest Adjournment of Lok Sabha after opposition riots | Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब

Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब

Parliament Winter Session 2024 ( Marathi News ):  संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचे कामकाज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाले. यावेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब करण्यात आले.

प्रत्यक्षात लोकसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल प्रश्न विचारण्यासाठी उठले तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले.

मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजपाचे खासदार अरुण गोविल यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित पूरक प्रश्न विचारले, त्यांना विभागाच्या मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरे दिली. यावेळी ओम बिर्ला व्यासपीठाजवळ पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना आपापल्या जागी जाण्याचे आवाहन केले आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्यास सांगितले. गोविल यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, ते पहिल्यांदाच प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालू द्यावे. मात्र, हा गोंधळ थांबला नाही आणि विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती.

लोकसभा अध्यक्षांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना सांगितले की, “प्रश्नाचा तास हा महत्त्वाचा काळ आहे, प्रत्येकाचा वेळ आहे. तुम्ही प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवू द्या, तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याची संधी दिली जाईल. तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गतिरोध निर्माण करू इच्छित आहात, ते योग्य नाही. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची मागणी केली. सकाळी ११.०५ च्या सुमारास आणि दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यघटनेवर दोन दिवस सभागृहात चर्चेची मागणी केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही वरच्या सभागृहात हीच मागणी केली आहे. यापूर्वी, माजी ॲटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्या अदानी समूहावरील आरोपांबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, आम्ही आज नियम 267 अंतर्गत प्रश्न उपस्थित करत आहोत, त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू.

राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन अहवालात करण्यात आलेल्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानींच्या अटकेची मागणी केली आहे. आज संसदेच्या परिसरात माध्यमामसोबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'अदानींना अटक झाली पाहिजे. किरकोळ आरोपांवरून अटक करण्यात आलेले अनेक लोक आहेत. अदानी अमेरिकन न्यायालयाचा आरोप मान्य करेल असे वाटते का?, असा सवालही गांधी यांनी केला.

Web Title: Rahul Gandhi demands Adani's arrest Adjournment of Lok Sabha after opposition riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.