शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

ED चौकशीत अधिकाऱ्यांचा खास सवाल; राहुल गांधींनीही दिलं 'स्मार्ट' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 4:57 PM

राहुल गांधींची ५ दिवसांत तब्बल ४० तास चौकशी

National Herald Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राहुल गांधींची ५ दिवस चौकशी केली. या ५ दिवसांत राहुल गांधींची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४० तास चौकशी केली. मात्र, राहुल गांधी यांनी चौकशीदरम्यान केलेल्या गोष्टींचा उल्लेख केला नाही. आज मात्र राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी त्यांच्याशी काय बोलत होते याबद्दल सांगितले. त्यावेळी त्यांनी काही मजेशीर किस्से सांगितले.

ईडीचा संदर्भ देत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, एके दिवशी रात्री ११ वाजता एका ईडीच्या अधिकाऱ्याने मला विचारले, "तब्बल ११ तास झाले. राहुल जी, तुम्ही अजूनही जरासुद्धा थकलेले दिसत नाही. तुमच्या चेहऱ्यावर ताणतणावर दिसून येत नाही. याचे उत्तर देताना, त्या अधिकाऱ्यांशी थोडंसं खोटं बोलावं असं मला वाटलं. त्यामुळे त्यांना म्हटलं, "मी विपश्यना करतो, त्यामुळे चेहऱ्यावर ताणतणाव दिसून येत नाही. मी काँग्रेसमधील कार्यकर्ता आहे. मला काँग्रेसने खूप काही शिकवलं आहे. संयमी वागणं ही काँग्रेसचीच शिकवण आहे. त्यामुळे तुमची चौकशी सुरू राहिली तर मी आणखी १० तास देखील चौकशीसाठी बसू शकतो."

आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले, “सत्य हे आहे की ईडीच्या चौकशीदरम्यान मी त्या खोलीत एकटा बसलो नव्हतो, तर काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता माझ्यासोबत तेथेच असल्यासारखे मला वाटत होते. तुम्ही एका माणसाला प्रश्न विचारून त्याच्यावर दबाव आणू शकता, पण काँग्रेसच्या करोडो नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांना तुम्ही थकवू शकत नाही. त्या खोलीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेतेच नव्हते, तर या सरकारविरोधात न घाबरता लढणारे सारे जण उपस्थित होते असे मला वाटत होते. त्यामुळे माझ्यावर अजिबातच दडपण नव्हते", असं राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस