राहुल भाई तर उगवता तारा; 2019 मध्ये वेगळी परिस्थिती असेल- नवज्योतसिंग सिद्धू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 02:06 PM2018-05-15T14:06:48+5:302018-05-15T14:06:48+5:30
कर्नाटकमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
नवी दिल्ली: राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील उगवता तारा असून 2019 नक्कीच वेगळी परिस्थिती असेल, असा विश्वास काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी सिद्धू यांनी म्हटले की, मी माझे जीवन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अर्पण केले आहे. राहुल भाई हे भारतीय राजकारणातील उगवता तारा आहेत. 2019 मध्ये निश्चितच वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल. अन्य राजकीय पक्ष राहुल यांना पाठिंबा देतील. जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेल तोपर्यंत मी राहुल गांधींसोबत असेन, असे सिद्धू यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे या विजयाबरोबरच भाजप आघाडीची २२ राज्यात सत्ता निर्माण झाली आहे. यापूर्वीच १५ राज्यात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून त्यात आता कर्नाटकची भर पडल्याने हा आकडा १६ वर जाणार आहे. कर्नाटक हातचे गेल्याने आता मिझोराम, पंजाब आणि पुदुचेरी या तीन राज्यांतच काँग्रेसची सत्ता उरली आहे. कर्नाटक निकालानंतर देशाच्या ६४.१४ टक्के लोकसंख्येवर एनडीएची, २.४९ टक्के लोकसंख्येवर काँग्रेसची तर २८ टक्के लोकसंख्येवर इतरांची सत्ता असल्याचं स्पष्ट झाले आहे.
I want to thank the people of Punjab, because of their prayers I have come out ten feet tall. I have sent a message to Rahul Gandhi ji & Priyanka Gandhi ji that my life is yours: Navjot Singh Sidhu, Punjab Minister after being acquitted under Section 304 in road rage case. pic.twitter.com/ixwfQBY8Dn
— ANI (@ANI) May 15, 2018
Rahul bhai is a leader in the ascent. 2019 will be a different ball game. The alliances are coming with him. Sidhu unke (Rahul Gandhi) saath khada rahega, jab tak mere andar lahu hai: Navjot Singh Sidhu, Punjab Minister on Karnataka election pic.twitter.com/gg1dcbdgJJ
— ANI (@ANI) May 15, 2018