शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
2
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
3
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
4
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
5
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
6
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
7
अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला
8
साप्ताहिक राशीभविष्य: 'या' राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा, मोठे काम पूर्ण होईल!
9
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य
10
Justin Bieber : जस्टिन बिबरने शेअर केले अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचे Inside photos
11
"पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 
12
एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...
13
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
14
IND vs PAK Champions : भारताच्या विजयाची हॅटट्रिक हुकली; पाकिस्तानचा मोठा विजय, दिग्गज मैदानात
15
Hathras Stampede : २४ आश्रम, २५ वाहनांचा ताफा, १०० कोटींची संपत्ती; जाणून घ्या 'भोले बाबां'कडे नेमकं काय आहे?
16
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
17
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video
18
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
19
"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं
20
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 8:50 PM

लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधींचा दौरा महत्वाचा मानला जातोय.

Rahul Gandhi Gujarat Visit : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (06 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातचा दौरा करणार आहेत. अलीकडेच, संसदेच्या अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सभागृहात आव्हान दिले होते की, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचा दारुण पराभव करेल. या आव्हानानंतर राहुल गांधींचा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.

राहुल गांधी कार्यकर्त्यांची भेट घेणार राहुल गांधींचा हा गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण म्हणजे, संसदेत हिंदू धर्मावर वक्तव्य केल्यानंतर गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन आगामी रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी गुरुवारी (04 जुलै) सांगितले की, ते राहुल गांधींशी बोलले आणि त्यांना अहमदाबादला येऊन स्थानिक नेत्यांच्या भेटी घेण्याची विनंती केली. गोहिल यांनी दौऱ्याच्या तारखेची पुष्टी केली नसली तरी, पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी शनिवारी अहमदाबादला पोहोचू शकतात.

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यालयात तोडफोड2 जुलै रोजी संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत ते म्हणाले होते की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते फक्त हिंसाचारावर बोलतात. भाजपने राहुल गांधींवर हिंदूंना हिंसक संबोधल्याचा आरोप केला. भाषणाच्या दुसऱ्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादच्या पालडी येथील काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी