राहुल गांधींकडे आहे एकिडोचा ब्लॅकबेल्ट; असा दिला पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:21 AM2017-11-02T03:21:21+5:302017-11-02T03:21:33+5:30
बॉक्सर विजेंदर कुमारसोबत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपणही ब्लॅकबेल्ट मिळवला असल्याचे सांगितले होते. त्याची बरीच चर्चाही झाली. अनेकांनी विश्वासही ठेवला नव्हता. पण आता सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या एकिडो या जापनिज मार्शल आर्टच्या ट्रेनिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत.
बॉक्सर विजेंदर कुमारसोबत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपणही ब्लॅकबेल्ट मिळवला असल्याचे सांगितले होते. त्याची बरीच चर्चाही झाली. अनेकांनी विश्वासही ठेवला नव्हता. पण आता सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या एकिडो या जापनिज मार्शल आर्टच्या ट्रेनिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रसिद्ध एकिडो ट्रेनर सेन्सई पारितोस कर हे राहुल गांधी यांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत.
राहुल गांधी आणि माझी भेट २००९मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी ट्रेनिंग घेतली आणि तेव्हापासून ते सातत्याने याचा सराव करत असतात, असे एकिडो ट्रेनर सेन्सई पारितोस कर यांनी म्हटले.
केव्हा मिळाला ब्लॅकबेल्ट : सेन्सई यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या एकिडोची टेस्ट घेण्यासाठी २०१३ साली जपान येथून मास्टर आले होते. त्यांच्यासमोर राहुल गांधी यांनी टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि त्यानंतरच त्यांना ब्लॅकबेल्ट देण्यात आला.
काय आहे एकिडो?
एकिडो हा मार्शल आर्टचा जापनिज प्रकार आहे. स्वयंरक्षणासाठी हा सर्वाधिक वापरला जातो आणि त्यात चाकू, तलवार किंवा एखादे हत्यारही चालवता येते.
मोरीहाई उशिबा नावाच्या व्यक्तीने एकिडो हा प्रकार निर्माण केला होता. त्यात एखाद्यावर शारीरिक दुखापत न करता
विजय मिळवला जातो. समोरच्याला अधिक इजा होऊ नये याचीही काळजी यात घेतली जाते.