तिरुवनंतपुरम : केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून पूर, भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी कॅांग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड गावातील रहिवाश्यांची भेट घेतली. तसेच रहिवाशांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून देण्यात येत आहेत.
याच दौऱ्यावेळी राहुल गांधींनी केरळ राज्याचे मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना देखील फोनवर चर्चा करुन केंद्र सरकारकडून मदत करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी रहिवाशांना सांगितले.
तसेच गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, केरळ या चार राज्यात अतिवृष्टीमुळे एकुण 174 जणांना प्राण गमवावा लागला. तसेच यामध्ये केरळमध्ये 76 जणांचा मृत्यू झाला आहे तर, महाराष्ट्रात 35 आणि गुजरात व कर्नाटक राज्यात 31- 31 जणांचा मृत्यू झाला आहे.