शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 6:34 AM

Rahul Gandhi News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. 

 नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती त्यांना काँग्रेस कार्यकारिणीने शनिवारी केली. यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीला सांगितले. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, अशी विनंती करण्याचा प्रस्ताव एकमताने  संमत करण्यात आला. काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच काँग्रेसचे अन्य मान्यवर नेते उपस्थित होते. 

काही राज्यांमध्ये पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचीही यावेळी बैठकीत दखल घेतली. लोकसभा निवडणुकांत जे यश मिळाले त्याबद्दल काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण आहे, मात्र ज्या राज्यांत अपयश आले, त्यामागील कारणे शोधण्यासाठी राज्यनिहाय समित्या स्थापन करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. पक्ष संघटनेतील उणिवा दूर करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन संबंधित राज्यातील पदाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आले.

मतदारांचे मानले आभारपक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, कार्यकारिणीच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची राहुल गांधी यांनी दखल घेतली असून, ते लवकरच यासंदर्भात निर्णय घेतील. लोकशाहीच्या, राज्यघटनेच्या रक्षणासाठी मतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत मतदान केले. त्याबद्दल मतदारांचे आभार मानणारा ठराव काँग्रेस कार्यकारिणीने बैठकीत संमत केला. 

‘राज्यघटनेचे संरक्षण हा प्रचारातील मध्यवर्ती मुद्दा बनला’काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रेचा आराखडा तयार केला होता. त्या यात्रांचे नेतृत्व त्यांनीच केले. त्या दोन यात्रांमुळे आपल्या देशाच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. लोकसभा निवडणुकांतही त्यांनी घणाघाती प्रचार केला. राज्यघटनेचे संरक्षण हा मुद्दा राहुल गांधी यांच्यामुळे निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनला, असे काँग्रेस कार्यकारिणीने म्हटले आहे.  

‘दशकभरातील कारभाराला जनतेने सपशेल नाकारले’लोकसभा निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या सुधारलेल्या कामगिरीचे स्वागत करताना, कार्यकारिणीने सांगितले की, लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधानांचा वैयक्तिक पराभव आहे, गेल्या दशकभरात पंतप्रधानांनी केलेल्या कारभाराला जनतेने सपशेल नाकारले आहे. बैठकीत मंजूर झालेल्या दुसऱ्या ठरावात, कार्यकारिणीने म्हटले की, हा निकाल म्हणजे २०१४ पासून लोकशाही आणि लोकशाही संस्थांच्या कमकुवतपणाच्या विरोधात जनतेचा निर्णय आहे. बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अजून एक ठरावात म्हटले आहे की, देशातील लोकांना आपल्या लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी, प्रजासत्ताक राज्यघटना राखण्यासाठी आणि सामाजिक आणि आर्थिक न्यायाची प्रगती करण्यासाठी, मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याची उत्तम संधी आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी