राहुल गांधी 'हायब्रिड', ते ब्राह्मण कसे असू शकतात?, भाजपाच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:42 PM2019-01-31T13:42:52+5:302019-01-31T13:53:35+5:30

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी आणखी एक वक्तव्य करुन नवीन वाद निर्माण केला आहे. यावेळेस त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi ‘a hybrid specimen’, says Union minister Anant Kumar Hegde | राहुल गांधी 'हायब्रिड', ते ब्राह्मण कसे असू शकतात?, भाजपाच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

राहुल गांधी 'हायब्रिड', ते ब्राह्मण कसे असू शकतात?, भाजपाच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Next
ठळक मुद्देअनंत कुमार हेगडे यांचा राहुल गांधींवर निशाणाराहुल गांधी 'Hybrid';मुस्लिम वडिलांचा आणि ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो? - हेगडे

बंगळुरू - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी आणखी एक वक्तव्य करुन नवीन वाद निर्माण केला आहे. यावेळेस त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी 'Hybrid' असल्याचे सांगत हेगडेंनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. 'मुस्लिम वडिलांचा आणि ख्रिश्चन आईचा मुलगा ब्राह्मण कसा असू शकतो?', असा प्रश्न उपस्थित त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना हेगडेंनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

हेगडे म्हणाले की, 'त्यांना (राहुल गांधी) धर्माची कोणतीही जाण नाहीय. वडील मुस्लिम, आई ख्रिश्चन, मुलगा ब्राह्मण... ही बाब कशी शक्य आहे?. पाहा ते किती खोट बोलत आहेत. जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत अशा प्रकारचे 'Hybrid' निर्माण केले जाऊ शकत नाही. पण आपल्या देशातील काँग्रेसच्या प्रयोगशाळेमध्येच केवळ हे उपलब्ध आहे, असे म्हणत हेगडेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद संपुष्टात आलेला नसतानाही हेगडेंनी आणखी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. यावरुन नवीन वाद रंगण्याची शक्यता आहे.  

कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना हेगडे म्हणाले होते की, ''जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते. तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावं तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे''

('डोकं धडापासून वेगळं करुन तुकडे-तुकडे करू', केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना जीवे मारण्याची धमकी)

तसेच ताजमहाल हे मुस्लिमांनी तयार केलेलं नाही. शाहजहाँनं ताजमहाल हा राजा जय सिंह यांच्याकडून विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचं निर्माण राजा परमतीर्थ यांनी केलं होतं.

ताजमहालचं पहिलं नाव तेजो महालय होतं. त्याचं नंतर ताजमहाल असं नामकरण करण्यात आलं. टीपू जयंतीवरही हेगडे यांनी टीका केली होती. ब्रिटिशांच्या काळात चार युद्ध लढणार टीपू सुलतान हा बलात्कारी होता. टीपू जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं हेगडेंनी स्पष्ट केलं आहे.  जे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिजीवी समजतात, त्यांची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते. 

Web Title: Rahul Gandhi ‘a hybrid specimen’, says Union minister Anant Kumar Hegde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.