Rahul Gandhi : अनेकदा माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत अनेकदा राहुल यांना प्रश्नही विचारण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. या भारत जोडो यात्रेदरम्यान (bharat jodo yatra) त्यांना त्यांची प्रतिमा खराब करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वजण अवाक् झाले.
या यात्रेने तुमची प्रतिमा किती बदलली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'तुमच्या मनात असलेल्या राहुल गांधीला मी कधीच मारले आहे. तो राहुल आता माझ्या मनात नाही, तो गेलाय. तुम्ही जो माणूस पाहत आहात, तो राहुल गांधी अजिबात नाही. तो फक्त तुम्हालाच दिसतोय. तुमचा विश्वास नसेल तर हिंदू धर्म वाचा, शिवजी वाचा. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपच्या मनात आहे, पण माझ्या मनात नाही.' असे उत्तर राहुल यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, 'मला माझ्या प्रतिमेची अजिबात पर्वा नाही. तुमच्या मनात माझ्याबद्दल जी प्रतिमा असेल, ती ठेवा. मला फक्त माझं काम करायचं आहे. माझ्या प्रतिमेत किती बदल झाला, हे तुम्हीच ठरवा. मी कोण आहे, काय आहे, हेही तुम्हीच ठरवा. मला याबाबत आता काहीही वाटत नाही, मी माझे काम करतोय आणि पुढेही करत राहीन.'
'सध्या देशात जे काही सुरू आहे, तो राजकीय लढा नसून देश वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई खरोखर राजकीय लढाई नाही. जेव्हा आपल्याकडे बसपा किंवा टीआरएसविरोधात निवडणुका होतात, तेव्हा ती राजकीय लढत असते. ज्या दिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशातील संस्था ताब्यात घेतल्या, तेव्हापासून हा लढा राजकीय नाही राहिला.