Rahul Gandhi Press Conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यावेळी पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.
1 टक्का लोकांकडे 40 टक्के संपत्तीयावेळी राहुल म्हणाले, देशातील 1 टक्का लोकांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे. देशातील फक्त 21 लोकांकडे 70 कोटी लोकांइतका पैसा आहे. देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के जीएसटी भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के जीएसटी भरतात. यावेळी सुरक्षेतील त्रुटींबाबत बोलताना राहुल म्हणाले, सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. ते मला मिठी मारायला आले होते. मला मिठी मारुन त्यांना खूप आनंद झाला. याला सुरक्षेतील त्रुटी म्हणता येणार नाही. हे यात्रेत नियमितपणे घडते.
RSS वर टीकास्त्रराहुल गांधी पुढे म्हणाले, आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत आहेत. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायपालिका काबीज केली आहे. ही पूर्वीची राजकीय लढाई नाही. आता लढा भारताच्या संस्था आणि विरोधक यांच्यातला आहे. मी कधीही आरएसएस कार्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा कापावा लागेल, असंही राहुल म्हणाले.
मी वरुण गांधींना मिठी मारू शकतो, पण...वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावर राहुल गांधी म्हणाले, ते सध्या भाजपमध्ये आहेत. माझी विचारधारा त्यांच्याशी जुळत नाही. माझा गळा कापला तरी मी RSS कार्यालयात जाऊ शकत नाही. वरुणने ती विचारधारा स्वीकारली. मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण त्याची विचारधारा स्वीकारू शकत नाही.
माध्यमांवरही भाष्य केलं...
राहुल गांधींनी यावेळी माध्यमांवरही भाष्य केलं. मी कधीच 'गोडी मीडिया' हा शब्द वापराल नाही किंवा आणला नहाी. मी पत्रकारांवर टीका करत नाही, मी मीडियाच्या रचनेवर टीका करतो. मला निष्पक्ष आणि स्वतंत्र माध्यम हवे आहे. माध्यमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. मीडिया विभाजनाचे काम करत आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम, ऐश्वर्या राय, तिकडं लक्ष नेता, पण इकडं गरिबी वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योग संपत आहेत, याकडं लक्ष दिलं पाहिजे. यावर कुणीच प्रश्न विचारत नाही, असंही ते म्हणाले.