Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:02 PM2022-09-05T23:02:44+5:302022-09-05T23:02:54+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात कामे केली जात आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,” असे राहुल गांधी म्हणाले.
“गुजरात हे नशेचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांचीच परवानगी?,” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
We will open up 3000 English-medium schools & will give free education to girls. BJP govt had shut thousands of schools. A Rs 5 subsidy to milk producers. Gas cylinders which are being sold at Rs 1000 as of now, will be given at Rs 500: Congress MP Rahul Gandhi pic.twitter.com/MIaws7Y0I9
— ANI (@ANI) September 5, 2022
अनेकआश्वासनं
“सत्तेत आल्यानंतर काँग्रेस कोरोना महासाथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देईल. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देऊ. आम्ही इंग्रजी माध्यमाच्या ३००० शाळा उघडू आणि मुलींना मोफत शिक्षण देऊ. सध्या १००० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिले जातील. मला बेरोजगारी संपवायची आहे. गुजरातमधील १० लाख तरुणांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल, याची मी खात्री देतो,” असं राहुल गांधी म्हणाले.