काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात कामे केली जात आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,” असे राहुल गांधी म्हणाले.
“गुजरात हे नशेचे केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांचीच परवानगी?,” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.