Rahul Gandhi in Wayanad: लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला पोहोचले. 2019 मध्ये राहुल याच जागेवरुन लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. राहुल आणि प्रियांका दोघेही रोड शोमध्ये सहभागी झाले. या रोड शोमध्ये त्यांचे शेकडो समर्थक पोहोचले होते. रोड शोपूर्वी प्रियंका गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली.
राहुल तुमच्या पाठीशी उभा आहे...त्या म्हणाल्या की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवण्यात गुंतले आहेत. मोदी रोज आपली ड्रेसिंग स्टाईल बदलतात, पण सर्वसामान्यांच्या जीवनशैलीशी त्यांना काही देणं-घेणं नाही. तुम्हाला माहित आहे की, राहुल सत्य बोलणारा व्यक्ती आहे. तो कोणालाही घाबरत नाही. सत्ताधारी त्याला हटवू पाहत आहे, पण तो त्याच्या जागी ठाम आहे. तो तुमचा संघर्ष समजून घेतो, तुमच्यासाठी काम करतो, तुमच्या पाठीशी उभा असतो.'
माझा भाऊ एकटाच आहेयावेळी प्रियांकांनी राहुल यांच्या वेदनांचे वर्णन करणारा एक किस्साही शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा राहुलची खासदारी गेली, तेव्हा तो सामान पॅक करण्यासाठी वायनाडला आला होता. त्या वेळेस मी माझ्या भावाचे सामान पॅक केले. मला मदत करण्यासाठी माझे पती आणि मुले आहेत, तो एकटाच बसला होता.' यावेली प्रियांका गांधींनी वायनाडच्या लोकांना आपले कुटुंबीय असल्याचे म्हटले.
राहुल गांदींचा यांचा केंद्रावर हल्लाबोलयावेळी राहुल म्हणाले की, 'चार वर्षांपूर्वी मी इथे आलो आणि खासदार झालो. येथील प्रचाराची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. सामान्य प्रचारात आपण धोरणांबद्दल बोलतो, पण जेव्हा मी येथे प्रचार केला तेव्हा मला वाटले की मी माझ्याच कुटुंबात आलो आहे. मी केरळचा नाही, पण तुमच्याकडून असे प्रेम मिळाले की जणू मी तुमचाच भाऊ किंवा मुलगा आहे. खासदार होणे म्हणजे काय ते मला कळले. वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही योग्य मार्गावर चाललो आहोत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरणार नाही,' असेही राहुल यावेळी म्हणाले.