नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी (23 फेब्रुवारी) दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तरुणांसोबत संवाद साधला. माझा राहुलजी ऐवजी राहुल असाचा उल्लेख करा असा सल्ला राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. या कार्यक्रमात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करता पळ काढतात असं राहुल यांनी म्हटलं असून मोदींना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे.
राहुल गांधी यांनी मोदी सरकार श्रीमंताचं कर्ज सरकार माफ करतं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही मार्ग नसतो असे म्हटले आहे. मोदी सरकारमध्ये शिक्षणाच्या बजेटमध्ये कपात झाली, सरकारने 15 ते 20 उद्योजकांना तीन लाख कोटी दिल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
Pulwama Attack : 'नरेंद्र मोदी हे 'प्राइम टाइम मिनिस्टर''पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही 'प्राइम टाइम मिनिस्टर' तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून मोदींवर टीका केली आहे. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती मिळल्यानंतरही तीन तास प्राइम टाइम मिनिस्टर शूटिंगमध्ये व्यस्त होते असे हिंदीमध्ये ट्वीट केले आहे. 'पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच PhotoShootSarkar हा हॅशटॅग वापरला आहे.