शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 1:32 PM

आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही, आझाद यांचा निशाणा.

काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडला होता आणि त्यानंतर टीकाही केली होती. परंतु आता पुन्हा एकदा आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नसल्याचंही आझाद म्हणाले. “मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं,” असंही ते म्हणाले.

“कोण स्वतः आपलं घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं,” असं काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले.

जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:ला पाहावं. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते, काँग्रेसमुक्त भारत. ज्या लोकांनी काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी त्यांची मदत केली, त्यांनी मोदींची भेट घेतल्याचंही ते म्हणाले. लोकसभेत भाषणादरम्यान त्यांची गळाभेट गेतली आणि म्हटलं की तुमच्यासाठी आमच्या मनात काही नाही. मग ते भेटले की आम्ही?, असं म्हणत आझाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

मोदींची स्तुतीआझाद यांनी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. “ज्या लोकांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही दिसते ते योग्य नाही. जर कोणी इतकंच अशिक्षित असेल, तर त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकावं. मोदींनी लग्न केलं नाही, त्यांची मुलं नाहीत.. मी त्यांना क्रूर समजत होतो, परंतु त्यांनी माणूसकी दाखवली,” असंही आझाद यांनी नमूद केलं.

सोनिया गांधींबाबतही वक्तव्यसोनिया गांधी यांनी १९९८ ते २००४ दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. त्या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकत होत्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. त्या कधीही हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधींचं राहुल गांधीवरील अवलंबत्व वाढलं. परंतु राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही. राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असं त्यांना वाटत असल्याचंही आझाद यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी