राहुल गांधी लालूंकडून शिकले ‘सिक्रेट रेसिपी’; राजकीय चर्चा, प्रियंकांनीही चाखली चव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:28 AM2023-09-04T07:28:53+5:302023-09-04T07:29:07+5:30

‘लालूजींची सिक्रेट रेसिपी आणि राजकीय मसाला,‘ अशी कॅप्शनही त्याला दिली.

Rahul Gandhi learned 'secret recipe' from Laluprasad Yadav | राहुल गांधी लालूंकडून शिकले ‘सिक्रेट रेसिपी’; राजकीय चर्चा, प्रियंकांनीही चाखली चव

राहुल गांधी लालूंकडून शिकले ‘सिक्रेट रेसिपी’; राजकीय चर्चा, प्रियंकांनीही चाखली चव

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारचे प्रसिद्ध ‘चंपारण मटण’ कसे बनवायचे याची ‘सिक्रेट रेसिपी’ राजद सुप्रीमो लालू यादव यांच्याकडून शिकले. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी शनिवारी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला. ‘लालूजींची सिक्रेट रेसिपी आणि राजकीय मसाला,‘ अशी कॅप्शनही त्याला दिली.

राहुल गांधी यांनी व्हिडिओसोबत लिहिले - लालूजी लोकप्रिय राजकारणी आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्याकडे आणखी एक लपलेली कला आहे - स्वयंपाक. ते आजारातून बरे झाल्यावर मला जेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा मला वाटते की, त्याची सिक्रेट रेसिपी का शिकू नये? राहुल यांनी सांगितले की, लालूंनी त्यांना प्रेमाने मांसाहारी रेसिपी शिजवून खूप चविष्ट जेवण बनवले.

प्रियांकांनी केली स्तुती
लालू यादव आणि मिसा भारती यांनी राहुल यांना रेसिपी बनवण्याची पद्धत दाखवली. लालूंनी आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. यानंतर राहुल, लालू आणि तेजस्वी एकत्र जेवायला जेवणाच्या टेबलवर बसले. राहुल यावेळी म्हणतात, माझ्या बहिणीने मला तिच्यासाठी काही आणण्यास सांगितले. मी तिच्यासाठी न घेतल्यास मोठी समस्या होईल. अर्थात राहुल यांनी जेवण पॅक करून घेतले, नंतर व्हिडिओच्या शेवटी प्रियंका राहुल यांनी आणलेले जेवणाची चव चाखताना आणि त्याची स्तुती करताना दिसतात.

Web Title: Rahul Gandhi learned 'secret recipe' from Laluprasad Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.