हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. याच पार्श्वभमीवर राहुल गांधी सोनीपतमधील गोहाना येथे दाखल झाले. यावेळी येथील जिलेबी खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही.
राहुल गांधी यांना गुहानाच्या जिलेबीची चव इतकी आवडली की, त्यांनी त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्यासाठी एक बॉक्स विकत घेतला. तसेच, या जिलेबीचा उल्लेखही राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभेत केला. राहुल गांधी म्हणाले की, "मी जिलेबीची चव चाखली. तसं लगेच प्रियांका यांना मेसेज करून सांगितलं की, मी आजपर्यंत अशी जिलेबी कधीच खाल्ली नाही. म्हणूनच मी तुमच्यासाठीही एक बॉक्स घेऊन येत आहे."
काय आहे जिलेबीची खासियत?दरम्यान, गोहानाची जिलेबी केवळ हरियाणामध्येच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जवळच्या शहरांतून लोक इथे जिलेबी खायला येतात. तसेच, ज्यावेळी या शहरातून लोक जातात, त्यावेळी गोहनामधील जिलेबी घ्यायला विसरत नाहीत.
एक किलोमध्ये फक्त ४ जिलेबी येतातदरम्यान, १९५८ मध्ये लाला मातुराम यांनी गोहाना येथे जलेबीचे दुकान उघडले होते. आज ६६ वर्षांनंतर मातुराम यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. या जिलेबीची खास गोष्ट म्हणजे त्या देशी तुपात बनवल्या जातात आणि एका जिलेबीचे वजन २५० ग्रॅम असते. एक किलो जिलेबीमध्ये फक्त चार जिलेबी तयार होतात.
पीएम मोदींनीही येथील जिलेबीची चव चाखलीयसण असो किंवा लग्नाव्यतिरिक्त कोणताही आनंदाचा प्रसंग, इथले लोक या जिलेबी नक्कीच घरी घेऊन जातात. सणासुदीच्या काळात मातुराम यांच्या दुकानातून एका दिवसात दोन हजार किलो जिलेबी विकली जात असल्याचा दावा केला जात आहे. या दुकानात एक किलो जिलेबीची किंमत ३०० रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या जिलेबीची चव चाखली आहे.