'राहुल गांधी हिंदू नाही ख्रिश्चन, 10 जनपथमध्ये देखील आहे चर्च'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 02:20 PM2017-09-28T14:20:18+5:302017-09-28T14:23:48+5:30

राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत  मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे.

'Rahul Gandhi is not a Hindu, Christian is also in 10 Janpath' | 'राहुल गांधी हिंदू नाही ख्रिश्चन, 10 जनपथमध्ये देखील आहे चर्च'

'राहुल गांधी हिंदू नाही ख्रिश्चन, 10 जनपथमध्ये देखील आहे चर्च'

Next

नवी दिल्ली - नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भाजपाचे नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीवर कडाडून टीका केली आहे. स्वामींनी राहुल गांधींच्या धर्मावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मला शंका आहे की राहुल गांधी ख्रिश्चन आहेत आणि 10 जनपथमध्ये देखील एक चर्च आहे अशी विखारी टीका स्वामींनी केली आहे. या नव्या वादग्रस्त विधानामुळे स्वामी पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.    

राहुल गांधी यांनी नुकताच तीन दिवसांचा गुजरात दौरा संपवला आहे. या दरम्यान त्यांनी पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा देवी मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी मंदिराच्या एक हजार पाय-या चढल्या. राहुल यांच्या मंदिरात जाण्यावर टीका करताना स्वामी म्हणाले, राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं असं म्हटलं आहे. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत  मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे. त्यांच्या घरात 10 जनपथमध्ये एक चर्च असल्याचीही मला शंका आहे अशी झोंबणारी टीका स्वामी यांनी यावेळी केली. 

स्वामींशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष जितू वघानी यांनीही राहुल गांधीवर टीका करताना 'गरब्यात आरती कशी करायची, दर्शन कसं घ्यायचं याबाद्दल राहुल गांधींना काहीच माहिती नाही. काँग्रेस नेत्यांना त्यांची मदत करावी लागली असं म्हटलं होतं.

राहुल गांधींची हिंदुत्वाची खेळी, तीन दिवसांच्या दौ-यात पाच मंदिरांना भेट-
जरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या सौराष्ट्रचा तीन दिवसांचा वादळी दौरा करत नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नवसृजन यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपाकडून काँग्रेसवर लावण्यात आलेल्या अनेक आरोपांचंही उत्तर दिलं. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्ड खेळलं. 
पटेल समाजासाठी अत्यंत महत्वपुर्ण असलेल्या कागवाड गावातील खोडलधाम येथेही ते गेले होते. येथे पटेल समाजातील लोकांनी एक भव्य मंदिर बांधलेलं आहे. राजकोटला परतल्यानंतर राहुल गांधी जलाराम बापा मंदिरात गेले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, राहुल गांधी या मंदिराला भेट देण्याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राहुल गांधी यांच्या यात्रेवर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ता मनीष दोषी यांनी सांगितलं की, 'भाजपा आणि आरएसएसचे लोक जाणुनबुजून काँग्रेसला हिंदू विरोधी सांगत असतात. राहुल गांधी यांनी मंदिरांना भेट देत केलेला दौरा हा त्यांना उत्तर आहे'. 
 

Web Title: 'Rahul Gandhi is not a Hindu, Christian is also in 10 Janpath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.