शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:53 PM

Rahul Gandhi on Kangana Ranaut : खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे.

Rahul Gandhi on Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही होतो. दरम्यान, त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ताज्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर भाजपने कंगना स्पष्ट शब्दात झापले. दरम्यान, आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, "शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारची प्रचार यंत्रणा सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहे. 378 दिवसांच्या मॅरेथॉन लढ्यात 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. या शेतकऱ्यांना बलात्कारी आणि परकीय शक्तींचे प्रतिनिधी म्हणून संबोधणे, हा भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आणि हेतूचा आणखी एक पुरावा आहे."

"हे लाजिरवाणे शेतकरी विरोधी शब्द म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. जो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही. शेतकरी आंदोलन मागे घेताना स्थापन करण्यात आलेली सरकारी समिती अजूनही थंडबस्त्यात आहे. सरकारला एमएसपीबाबतची भूमिका आजतागायत स्पष्ट करता आलेली नाही. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. आता त्यांचे चारित्र्यहनन सुरू आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात लपून राहू शकत नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपने कितीही षडयंत्र रचले तरी इंडिया आघाडी शेतकऱ्यांना MSP ची कायदेशीर हमी देईल," अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काय म्हणाल्या होती कंगना रणौत?दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाल्या की, "आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.'

भाजपने कंगना रणौतला झापलेकंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, "भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना राणौतच्या विधानावर असहमत आहे. कंगनाला पक्षाच्या वतीने धोरणावर बोलण्याची परवानगी नाही. त्यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKangana Ranautकंगना राणौतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन