न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 08:44 AM2023-06-18T08:44:38+5:302023-06-18T08:44:50+5:30
याआधी मोदी आडनावासंदर्भात खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले होते.
रांची : मोदी आडनावाबद्दल केलेल्या शेरेबाजीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यात त्यांना झारखंडमधील रांची न्यायालयाने अंतिम समन्स जारी केले आहे. ४ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. न्यायालयात हजर न राहण्याची सवलत द्यावी, असा राहुल गांधी यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
याआधी मोदी आडनावासंदर्भात खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले होते.