नवी दिल्ली : एप्रिल व मे महिन्यात ५ राज्यांमधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे भवितव्य सुमारे १५ कोटी मतदार ठरवणार आहेत. यापैकी सध्या सत्तेवर असलेल्या केरळ व आसाममधे पुन्हा बहुमत मिळवून तामिळनाडू, प.बंगाल, पुड्डुचेरीमध्येही अपेक्षेनुसार चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतरच्या पुढील महिन्यात राहुल गांधींची पक्षाध्यक्षपदी हमखास निवड होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली.राहुल गांधींची जनमानसावर पकड किती प्रमाणात वाढली, याची पाच राज्यांच्या निवडणुकीत कसोटी आहे. केरळ आणि आसाम या काँग्रेसशासित राज्यांत प्रथमच मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत राहुल मैदानात उतरले आहेत. मात्र तिथे काँग्रेसला निवडणूक सोपी नाही. दोन्ही ठिकाणी सत्ता गमावण्याची पाळी काँग्रेसवर आल्यास, कर्नाटक, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातच काँग्रेसची सत्ता शिल्लक राहील. आसाममधे गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १२६ पैकी ७८ जागा मिळाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
...तर पक्षाध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे
By admin | Published: March 07, 2016 10:58 PM