शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 7:52 PM

Dharmendra Pradhan: 'आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली.'

Dharmendra Pradhan on Rahul Gandhi :काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी (29 जुलै) लोकसभेत केलेल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आयोजित हलवा समारंभाचे पोस्टर दाखवले. आता यावरुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

'राहुल गांधींनी ट्यूशन घ्यावी'धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना सभागृहाच्या मर्यादेत राहून कसे बोलावे, याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यांनी सभागृहाचे नियम नीट समजून घ्यावेत आणि त्यानुसार वागावे. सभागृह हे राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असते, स्वतःच्या राजकारणासाठी संसदेच्या प्रतिष्ठेची खिल्ली उडवणे निषेधार्ह आहे. निवडणूक रॅलीत भाषण करणे आणि संसदेत भाषण करणे, यात फरक आहे. आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली,' अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

'बालबुद्धी असण्याचा हा तोटा आहे'ते पुढे म्हणाले की, 'विरोधक नेहमीच संविधान दाखवतात, पण सुरुवातीपासूनच ते संविधानाचा अपमान करत आले आहेत. मूळात हेच लोक सर्वात मोठे संविधानविरोधी आहेत. देशातील दलित, गरीब, शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू आणि मध्यमवर्गीयांबद्दल काँग्रेसचे काय विचार आहेत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने देशाला घराणेशाही, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि कुशासनाच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवले, ज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये देशाला मुक्त केले. 'बालबुद्धी' असण्याचा हा तोटा आहे. आधी गोष्टी वाचत नाहीत, वाचल्या तरी समजायला अडचण येते,' अशी बोचरी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी