Rahul Gandhi Praises PM Modi: भाजप आणि काँग्रेसमध्ये किती वैर आहे, हे कुणापासूनच लपलेलं नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर नेहमी टीका करताना दिसतात. काँग्रेस नेते राहुल गांधीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. राहुल यांनी क्वचितच पंतप्रधान मोदींचे कौतुक केले असेल. पण ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी पीएम मोदींच्या दोन योजनांचे कौतुक केले आहे.
केंब्रिजमध्ये राहुल काय म्हणाले?केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधींना विचारण्यात आले की, जनतेला फायदा झाला, अशा मोदी सरकारच्या धोरणांबद्दल ते सांगू शकतात का? यावर राहुल गांधी म्हणाले की, उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर देणे आणि लोकांचे बँक खाते उघडणे, या दोन चांगल्या योजना आहेत.
मोदींवर राहुल गांधींची टीकायावेळी राहुल यांनी मोदींवर टीकाही केली. ते त्यांचे विचार भारतावर लादत आहेत. हे कोणीही मान्य करणार नाही. यावेळी राहुल गांधींनी दावा केला की, त्यांच्या आणि इतर अनेक विरोधी नेत्यांच्या फोनवर पेगासस स्पायवेअरद्वारे लक्ष ठेवले जात होते. गुप्तचर अधिकाऱ्यांनी फोनवर बोलताना बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचेही राहुल म्हणाले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर राहुल गांधींच्या व्याख्यानाचा व्हिडिओ जारी केला आहे.
विरोधकांवर गुन्हे दाखलराहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला (विरोधकांना) सतत दबाव जाणवत आहे. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्याविरुद्ध काही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थेने पेगासस स्पायवेअरचा वापर करुन 300 हून अधिक भारतीय मोबाइलवर पाळत ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन संसदेत आणि संसदेबाहेर सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.