- शीलेश शर्मा।नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्याकडे आॅक्टोबरमध्येच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देणे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल गांधी यांना २३ ते २७ आॅक्टोबर या काळात ही जबाबदारी दिली जाईल. राहुलना अध्यक्षपद देण्याच्या वृत्ताला सोनिया गांधी यांनी दुजोरा दिला. राहुलना अध्यक्ष करण्याची चर्चा पक्षात व बाहेरही बराच काळ सुरू आहे; सोनिया गांधी यांनी त्याला दुजोरा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रदेश काँग्रेस समित्यांनी देखील राहुल यांना अध्यक्ष करण्याबाबतची पत्रे सोनिया यांना पाठविली आहेत.प्रियंका यांच्याकडे सोशल मीडियाराहुल अध्यक्ष झाल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल?, याची चर्चा सुरू आहे. काही नेत्यांचे म्हणणे आहे की, सोनिया यांच्यासाठी एखादे पद निर्माण करता येईल. मात्र त्या अशा मताच्या नसल्याचे कळते. त्या संसदीय दलाच्या प्रमुख असतील. सध्या प्रियंका गांधी सोशल मीडियात राहुल यांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सोशल मीडिया आक्रमक दिसत आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती अमेरिकेच्या केंब्रिज एनालिटिका कंपनीच्या मदतीने तयार करण्याचा काँग्रेस विचार करीत आहे. याच कंपनीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी होती. सॅम पित्रोदा यांच्या सांगण्यावरून हा प्रयोग करण्यात येणार आहे. राहुल यांनी अमेरिकेत कंपनीच्या अधिकाºयांशी चर्चाही केली.
दिवाळीनंतर राहुल गांधी अध्यक्षपदी; सोनिया गांधींना नको कोणतेच पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:42 PM