ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 26 - उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला रोज नविन वळण मिळतं आहे. उत्तरप्रेदश मधिल महाराजगंजमधील सभेत अमित शाह यांनी काँग्रेस-सपाच्या युतीवर तोंडसुख घेताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 104 उपग्रह सोडण्याचे काम केले, राहुल गांधी पंक्चर झालेल्या सायकलला धक्का देण्याचे काम करत आहेत. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, यंदा उत्तर प्रदेशात 2014 पेक्षाही मोठी लाट पाहायला मिळते आहे. 11 मार्च रोजी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. भाजपा सरकार स्ततेत आल्यानंतर उत्तरप्रदेशमधिल सर्व कत्तल खाने बंद करण्यात येतिल. अखिलेश यादव भाजपा सरकारवर विकासकामात अडथळे आणल्याचा आरोप करत आहे. या सपा सरकराने केंद्राकडून मिळालेला निधीही खर्च केला नाही. दरम्यान, यापुर्वी, अमित शहा यांनी विरोधकांची तुलना कसाबशी केली आहे.कसाब हा पाकिस्तानमधील एक दहशतवादी होता. ज्याला मुंबईतल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरवून फाशी देण्यात आली होती. मात्र अमित शाह यांनी आझमगड येथे रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पार्टी आणि ब म्हणजे बहुजन समाज पार्टी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा विकास हा या कसाबमुळेच थांबला आहे. या कसाबला उत्तर प्रदेशमधून बाहेर हाकलून द्या.
राहुल गांधी देतायत पंक्चर सायकलला धक्का - अमित शहा
By admin | Published: February 26, 2017 4:11 PM