काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:26 AM2019-05-30T06:26:50+5:302019-05-30T06:27:06+5:30

महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत आहे.

Rahul Gandhi rejected the Congress leaders' formula | काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला राहुल गांधींनी फेटाळला

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत असून, ते राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांचे फोन घेणेही आता बंद केले आहे.
पक्षाच्या २५ व २७ मे रोजी झालेल्या बैठकांनंतर राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांना भेटही दिलेली नाही. काही नेते काल, मंगळवारी त्यांना भेटण्यास त्यांच्या निवास्थानी गेले होते, पण त्यांना टाळून राहुल गांधी आपल्या होंडा कारमधून निघून गेले. बाहेर जाताना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांनाही कळविले नव्हते. नंतर ते प्रियांका गांधी यांच्या लोधी इस्टेटभागातील घरी दिसले. नेत्यांशी बोलण्यास, भेटण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला असल्याने प्रियांका गांधीच नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची बित्तंबातमी माध्यमांना मिळाल्याने ते संतापले आहेत. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना ज्योतिरादित्य सिंदिया लंडनला गेल्याबद्दल राहुल यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. काही नेत्यांनी आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी कसा आग्रह धरला, याचा उल्लेख त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. बैठकीतील काही भागच एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. त्यामुळे ती फित काँग्रेस नेत्याकडूनच गेली, अशी राहुल गांधी यांची खात्री आहे.
हंगामी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, ए. के. अँथनी यांची नावे पुढे येत आहेत. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे समजते. मोतिलाल व्होरा व शीला दीक्षित ही नावेही घेतली जात आहेत. पण त्यांना पक्षाची सूत्रे सोपवली जातील का, ही शंका आहे.
>कार्यकर्त्यांचे धरणे
राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदी राहावे, यासाठी काँग्रेसचे २0 कार्यकर्ते आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात
घेऊ न पोलीस ठाण्यात नेले. त्यांना
सोडून देण्यात आल्यावर ते कार्यकर्ते
पुन्हा राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसले.

Web Title: Rahul Gandhi rejected the Congress leaders' formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.