Uttarakhand Election 2022: “पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:30 PM2022-02-10T23:30:37+5:302022-02-10T23:31:38+5:30

Uttarakhand Election 2022: चीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी उत्तरे देत नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

rahul gandhi replied pm narendra modi criticism over congress in parliament and interview | Uttarakhand Election 2022: “पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

Uttarakhand Election 2022: “पंतप्रधानांना घाबरत नाही, मोदींच्या उद्धटपणावर हसू येतं”; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

Next

हरिद्वार: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर यांसह उत्तराखंड राज्यातही विधानसभा निवडणुका (Uttarakhand Election 2022) आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हरिद्वार दौऱ्यावर असून, येथील मंगलौर येथे त्यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदींना घाबरत नाही. याउलट त्यांच्या उद्धटपणावर हसू येते, असा पलटवार राहुल गांधी यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार पलटवार केला. यानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील एका प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पंतप्रधानांना घाबरत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील त्यांचा पूर्ण वेळ काँग्रेसबद्दल बोलण्यासाठी दिला. पण त्यांनी चीनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले नाही. त्यांच्या मुलाखतीमध्ये मोदी म्हणतात, ‘राहुल गांधी ऐकत नाहीत’. तुम्हाला याचा अर्थ कळला का? याचा अर्थ ईडी किंवा सीबीआयचा दबाव राहुल गांधींवर काम करत नाही. त्यांना म्हणायचेय की, राहुल गांधी माझे ऐकत नाहीत. मी त्यांच्यावर कितीही दबाव टाकला, तरी ते मागे हटत नाहीत. ते ऐकत नाहीत. मी मोदींचे का ऐकू? नरेंद्र मोदींनी नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून देशातील लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांचे मोठे नुकसान केले आहे. मी त्यांना घाबरत नाही. त्यांच्या उद्धटपणामुळे मला हसू येते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

दरम्यान, काही विषयांवर परराष्ट्र, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. ज्या विषयांवर गरज पडली, तिथे मी स्पष्टीकरण दिले आहे. पण जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल गांधी यांचे नाव न घेतला केली होती. 
 

Web Title: rahul gandhi replied pm narendra modi criticism over congress in parliament and interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.